

Mahmudullah : बांगलादेशचा क्रिकेटपटू महमुदुल्लाहने विचित्र रेकॉर्ड बनवला आहे. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये, ऑस्ट्रेलियाने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशच्या डावात महमुदुल्लाह ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या चेंडूला बळी पडला. पॅट कमिन्स हॅट्ट्रिक घेण्यात यशस्वी ठरला. हॅट्ट्रिक विकेटमध्ये महमुदुल्लाहच्या विकेटचाही समावेश आहे.
महमुदुल्लाह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्यांदा हॅट्ट्रिकमध्ये बाद झाला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असा नकोसा विक्रम एखाद्या खेळाडूच्या नावाशी जोडला गेला आहे. त्याचवेळी, बांगलादेशविरुद्ध टी-20 मधील ही 7वी हॅटट्रिक होती, जी कोणत्याही संघाविरुद्धची सर्वोच्च आहे. 7 हॅट्ट्रिकपैकी बांगलादेशी फलंदाज महमुदुल्लाह हॅट्ट्रिक होताना तीन वेळा बाद झाला आहे. महमुदुल्लाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा हॅटट्रिकमध्ये सामील आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तीन वेळा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा आणि कसोटीत एकदा.
हेही वाचा – 96% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या ‘या’ देशात हिजाब बंदी!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात महमुदुल्लाहला पॅट कमिन्सने 2 धावांवर बाद केले. या सामन्यात कमिन्सने 4 षटकात 29 धावा देत 3 बळी घेतले. त्याचबरोबर ॲडम झाम्पाने 2 विकेट घेतल्या. सुपर 8 मधील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच सामना होता.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 140 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली. 100 धावांवर पाऊस आला आणि सामना थांबवण्यात आला. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पाऊस थांबला नाही, त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 28 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा