Chamika Karunaratne Injured : कॅंडी फाल्कन्स आणि गॅले ग्लॅडिएटर्स यांच्यातील लंका प्रीमियर लीग सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तोंडावर चेंडू लागल्याने चमिका करुणारत्नेचे चार दात पडले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.
चमिका या लीगमध्ये कॅंडी फाल्कन्सच्या वतीने खेळत आहे. गॅले ग्लॅडिएटर्सच्या डावातील चौथ्या षटकात कर्णधार कार्लोस ब्रॅथवेट षटक टाकत होता. षटकाचा पहिला चेंडू, नुवानिडू फर्नांडोने कव्हरवर मारण्याचा प्रयत्न केला. विरुद्ध दिशेने धावत असलेल्या चमिका करुणारत्नेने झेल घेतला आणि चेंडू सहकाऱ्याच्या दिशेने फेकला. या प्रयत्नात चेंडू चमिकाच्या चेहऱ्यावर लागला.
हेही वाचा – Rahu Gochar : २०२३ मध्ये ‘या’ राशींच्या लोकांना धनलाभ, कोणाचे नशीब खुलणार? जाणून घ्या ‘त्या’ ३ राशी
Sri Lanka's Chamika Karunaratne loses 4 teeth while taking a catch during a Lanka Premier League game on December 7. #SriLanka #Cricket pic.twitter.com/WwfOXLyiqj
— G Plus (@guwahatiplus) December 9, 2022
फर्नांडो आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी चमिकाच्या तोंडावर जखमा झाल्याने त्याचे चार दात तुटले. श्रीलंकेच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
I am back. pic.twitter.com/j5n4doGjur
— Chamika Karunaratne (@chamikak29) December 8, 2022
Chamika Karunaratne's Instragram story. pic.twitter.com/w2rpja7rAL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2022
२६ वर्षीय चमिका करुणारत्ने आयपीएल २०२२ मध्ये केकेआर संघाचा भाग होता. २०२३ साठी केकेआरने त्याला रिटेन ठेवलेले नाही. तो अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने श्रीलंकेसाठी १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३४.१८ च्या सरासरीने ३७६ धावा केल्या आहेत. ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २१ बळी घेतले आहेत, तर १५.११च्या सरासरीने २५७ धावा केल्या आहेत.