

Ajinkya Rahane And His Wfe Blessed With A Baby Boy : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर क्रिकेटर अजिंक्य रहाणेचे घर अधिक आनंदित झाले आहे. रहाणे दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. ”पत्नी राधिकाने मुलाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त आहेत”, असे रहाणेने सांगितले. सोशल मीडियावर रहाणेला सतत शुभेच्छा देत आहेत.
योगायोगाने, रहाणे ऑक्टोबर २०१९ मध्ये पहिल्यांदा वडील झाला. यावर्षी त्याची पत्नी राधिकाने मुलगी आर्याला जन्म दिला. लग्नाच्या ५ वर्षानंतर त्याला हे पहिले अपत्य झाले. २७ जानेवारी २०२१ रोजी, राधिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये आर्या तिचे वडील अजिंक्यसोबत खेळताना दिसत आहे. यादरम्यान वडील आणि मुलीचे खास नाते स्पष्ट दिसत होते.
हेही वाचा – मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 5, 2022
अजिंक्य रहाणे एकेकाळी तिन्ही फॉरमॅटचा महत्त्वाचा खेळाडू होता. आपल्या उजव्या हाताच्या कलात्मक फलंदाजी आणि मजबूत तंत्राच्या जोरावर त्याने जगाच्या कानाकोपऱ्यात धावा केल्या. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. दोन वर्षांनंतर २०१३ मध्ये त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले, पण आधीच टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधून बाहेर पडलेला अजिंक्य आता कसोटी संघातही पुनरागमन करण्याच्या संधी शोधत आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा फॉर्म उतरणीला लागला आहे.