

Cricketer Amit Mishra Sent RS 500 To Fan : टीम इंडियाचा लेगस्पिनर अमित मिश्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अमित मिश्राने केलेले ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहेत आणि चाहतेही त्यावर भरपूर कमेंट करतात. आता अमित मिश्राने सुरेश रैनाची स्तुती करत एक ट्वीट केले आहे, ज्यावर एका चाहत्याने अमित मिश्राला ३०० रुपये पाठवण्याची मागणी केली आहे जेणेकरून तो त्याच्या मैत्रिणीसोबत डेटवर जाऊ शकेल. विशेष म्हणजे अमित मिश्राने त्या चाहत्याची मागणी पूर्ण करत UPI द्वारे ५०० रुपये पाठवले.
खरं तर, बुधवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२२ च्या उपांत्य फेरीदरम्यान, भारताचा दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने एक शानदार झेल घेतला. तो झेल पाहून अमित मिश्राही खूप प्रभावित झाला आणि व्हिडिओ शेअर करताना त्याने कमेंट केली, ”भाऊ मी तुझ्याकडून टाईम मशीन घेऊ शकतो का? जुन्या काळात तुम्ही ज्या पद्धतीने फिल्डींग उतरत होता ती आजही करत आहात, ते पाहून मला आश्चर्य वाटते.”
Bhai @imraina, can I borrow your Time Machine? It’s mesmerising to see you field like old times. 😇👍 https://t.co/5YIvJAKELW
— Amit Mishra (@MishiAmit) September 29, 2022
हेही वाचा – गुजरातमध्ये पकडल्या २५ कोटींच्या बनावट नोटा..! लिहिलंय, “रिव्हर्स बँक ऑफ इंडिया”
याच ट्विटला उत्तर देताना आदित्य कुमार सिंह नावाच्या चाहत्याने अमित मिश्राला ३०० रुपये पाठवण्याची विनंती केली जेणेकरून तो त्याच्या मैत्रिणीसोबत डेटवर जाऊ शकेल. या यूजरने त्याचा UPI आयडीही शेअर केला आहे. त्यानंतर अमित मिश्रानेही त्या चाहत्याला ५०० रुपये पाठवले. या पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करताना मिश्राने लिहिले, ‘Done, डेटिंगसाठी शुभेच्छा.’
Done, all the best for your date. 😅 https://t.co/KuH7afgnF8 pic.twitter.com/nkwZM4FM2u
— Amit Mishra (@MishiAmit) September 29, 2022
३९ वर्षीय अमित मिश्रा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल २०२२च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. अमित मिश्रा गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. लेगस्पिनर अमित मिश्रा हा आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. अमित मिश्राने आतापर्यंत १५४ सामन्यांत २३.९७ च्या सरासरीने आणि ७.३५च्या इकॉनॉमी रेटने १६६ बळी घेतले आहेत.