Cricketer Dhawal Kulkarni Get Trolled : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या 36व्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधी आपल्या सहकाऱ्यांना हॉटेल पार्टी दिली. या पार्टीत मुंबई इंडियन्सचे आजी माजी खेळाडूही दिसले. रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ग्रीन आणि ब्लॅक कलरच्या वन पीस ड्रेसमध्ये रितिका सुंदर दिसत होती, तर रोहितही ब्लॅक जीन्स आणि शर्टमध्ये सुंदर दिसत होता. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळलेला वेगवान गोलंदाज आणि मराठमोळा क्रिकेटपटू धवल कुलकर्णीही पार्टीत पोहोचला. सोशल मीडियावर धवलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून लोक त्याला ट्रोल करत आहे.
नक्की काय घडलं?
धवल कुलकर्णी हॉटेलमध्ये पार्टीसाठी जात असताना त्यांच्या समोरच्या गेटबाहेर एक महिला फोनवर बोलत असताना बाजूच्या बॅरिकेडमध्ये अडकल्याने खाली पडली. धवलने क्षणभर त्या महिलेकडे पाहिले आणि थांबला पण नंतर उभा राहिला आणि फोटोसाठी पोझ देऊ लागला. मात्र, नंतर काही लोकांनी महिलेला उचलून नेले. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी धवलला ट्रोल केले.
हेही वाचा – रोड थोडी थोडी बिअर प्यायल्याने शरीराला फायदा होतो की नुकसान? जाणून घ्या!
धवल कुलकर्णीच्या या व्हिडिओवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “त्याला महिलांचा आदर नाही.” त्याचवेळी, दुसर्या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे, “जर एखादी मुलगी किंवा मुलगा पडला तर त्याला उचलले पाहिजे, परंतु तो फोटो काढत आहे. फेम जो मिल गया अब क्या काम दुनिया से.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!