

Prithvi Shaw And Nidhhi Tapadiaa : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ नवरात्रीत गरबा शिकत आहे. शॉने त्याच्या इंस्टाग्राम त्याला गरबा शिकवणाऱ्या सुंदर मिस्ट्री गर्लचा फोटो देखील शेअर केला आहे. ही मिस्ट्री गर्ल म्हणजे निधी तपाडिया. शॉ आणि निधी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. निधी ही इंटरनेट आणि इंस्टाग्राम सेन्सेशन आहे. ती एक मॉडेल देखील आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंचा बोलबाला आहे.
पृथ्वी शॉने काही दिवसांपूर्वी त्याचे काही फोटोही शेअर केले होते आणि त्याने निधीला फोटो क्रेडिट दिले होते. फोटो क्रेडिट देण्यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. हार्ट इमोजी घेऊन गरबा शिकवल्याबद्दल पृथ्वीने निधीचे आभारही मानले. निधीने Elle India, Manyavar Mohey इत्यादी अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

हेही वाचा – नाळ २ चित्रपटाची घोषणा..! नागराज मंजुळे म्हणाले, “इतकी अनपेक्षित…”
निधी तपाडिया भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या CID या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसली आहे. निधी प्रसिद्ध पंजाबी गायक कुलविंदर बिल्लाच्या ‘जट्टा कोका’ या गाण्यात दिसली आहे. भारत अ संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने अलीकडेच न्यूझीलंड अ विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. याआधीही पृथ्वीचे नाव टीव्ही शो अभिनेत्री प्राची सिंहसोबत जोडले गेले आहे. निधी तपाडियाचे इंस्टाग्रामवर 102K फॉलोअर्स आहेत.