फक्त 1 वर्ष खेळण्यासाठी एमबाप्पेला मिळणार 2,718 कोटी? विराटला किती मिळतात? वाचा!

WhatsApp Group

Virat Kohli vs Kylian Mbappe : विराट कोहली हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू आहे. गेल्या वर्षी त्याने जवळपास 277 कोटींची कमाई केली होती. तो आयपीएल संघ आरसीबीकडून खेळतो. त्याला 2023 मध्ये टी-20 लीग खेळण्यासाठी फ्रेंचायझीकडून 15 कोटी रुपये मिळाले. जवळपास 16 वर्षात इंडियन प्रीमियर लीगमधून त्याने आतापर्यंत 173 कोटी रुपये कमावले आहेत.

त्याच वेळी, 24 वर्षीय फ्रेंच फुटबॉलर किलियन एमबाप्पेला सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब अल हिलालकडून एका वर्षासाठी सुमारे 2,718 कोटी (33 कोटी 20 लाख डॉलर) रुपये मिळू शकतात. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रेंच कर्णधार एमबाप्पेने पॅरिस सेंट-जर्मेनला आपला करार वाढवू नये असे सांगितले आहे. याच कारणामुळे तो पीएसजीसोबतच्या हंगामपूर्व दौऱ्यात जपानलाही गेला नव्हता.

हेही वाचा – Optical Illusion : तुम्हाला या फोटोत पहिलं काय दिसलं? उत्तरात दडलंय तुमचं व्यक्तिमत्त्व!

किलियन एमबाप्पे आणि अल हिलाल यांच्यात करार झाला तर तो सर्वात महागडा फुटबॉलपटू बनेल. तो 2017 मध्ये मोनॅकोमधून सुमारे 1700 कोटी रुपयांमध्ये पीएसजीमध्ये दाखल झाला होता. इंग्लिश क्लब चेल्सीव्यतिरिक्त मँचेस्टर युनायटेड, इंटर मिलान आणि बार्सिलोनानेही एमबाप्पेला खरेदी करण्यात रस दाखवला.

अल हिलाल क्लबबद्दल बोलायचे तर तो सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीच्या मालकीचा आहे. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही अल नासेरमध्ये सामील झाला आहे. याचबरोबर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनेही युरोप सोडून अमेरिका गाठले आहे. मेस्सी अमेरिकेतील इंटर मियामीच्या वतीने खेळतो.

2023 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत किलियन एमबाप्पे तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सनुसार त्यांची कमाई जवळपास 980 कोटी रुपये होती. रोनाल्डो 1112 कोटी रुपयांसह पहिल्या तर लिओनेल मेस्सी 1063 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिघेही फुटबॉलपटू आहेत. सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-50 खेळाडूंमध्ये विराट कोहली नाही.

एमबाप्पेची कामगिरी पाहता डिसेंबर 2022 मध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध त्याने हॅट्ट्रिक केली होती, पण संघाचा अंतिम फेरीत पराभव झाला होता. लिओनेल मेस्सीने पहिला विश्वचषक जिंकला. रोनाल्डोला अद्याप विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

एमबाप्पेने आतापर्यंत फ्रान्सच्या संघासाठी 70 सामने खेळले आहेत आणि 40 गोल केले आहेत. तो 2017-19 मध्ये PSG कडून खेळला. त्यानंतर 27 सामन्यात 13 गोल केले. 2018 मध्ये, तो नियमितपणे संघात सामील झाला. तेव्हापासून त्याने पीएसजीसाठी 149 सामन्यांत 135 गोल केले आहेत.

एमबाप्पेने फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. 2018 मध्ये फ्रान्सने विश्वचषक जिंकला होता. एमबाप्पेचाही संघात समावेश होता. विश्वचषकात त्याने 4 गोल केले. फ्रान्ससाठी फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. एमबाप्पेला फिफा युवा खेळाडूचा पुरस्कारही देण्यात आला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment