पाकिस्तानमध्ये टाइमपास करू नकोस…, हरभजन सिंगचा गॅरी कर्स्टन यांना सल्ला!

WhatsApp Group

Harbhajan Singh To Gary Kirsten : पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी संघात सुरू असलेल्या गटबाजीबाबत खळबळजनक विधान केले आहे. पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत, त्यामुळे संघात एकता नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली. भारताचा माजी फिरकीपटू हरनभजन सिंगने कर्स्टन यांना एक संदेश पाठवून पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्यास सांगितले.

पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांच्या निराशाजनक टी-20 विश्वचषक मोहिमेदरम्यान एकमेकांना पाठिंबा न दिल्याबद्दल कर्स्टन यांनी टीका केली. ते म्हणाले, मी संघात असे विषारी वातावरण कधीही पाहिले नव्हते. कर्स्टन यांनी यूएस आणि वेस्ट इंडिजमधील स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता परंतु पहिल्या फेरीत अमेरिका आणि भारत यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने ते निराश झाले होते.

काय म्हणाला हरभजन?

हरभजन म्हणाला, “तिथे तुझा वेळ वाया घालवू नकोस गॅरी… टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी परत ये. तू एक दुर्मिळ व्यक्तींपैकी एक.. आमच्या 2011 च्या संघातील एक उत्तम प्रशिक्षक, मार्गदर्शक, प्रामाणिक आणि अतिशय प्रिय मित्र.. आमचे 2011 विश्वचषक विजेते प्रशिक्षक. खास माणूस गॅरी कर्स्टन.”

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकात खराब कामगिरी केली आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. यानंतर बाबरने संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. बाबरने कर्णधारपद सोडल्यानंतर, पाकिस्तानी बोर्डाने शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाने न्यूझीलंडमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली. त्यानंतर टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बाबर आझमला पुन्हा एकदा टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र संघाला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करता आली नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment