Video : “माझ्या बहिणीला कॅन्सर आहे”, एजबॅस्टन टेस्ट जिंकल्यावर भावूक झाला आकाश दीप, म्हणाला…

WhatsApp Group

Akash Deep Dedicates Victory to Sister : इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३३६ धावांनी विक्रमी विजय मिळवला. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली. आकाशने इंग्लंडच्या पहिल्या डावात चार बळी घेतले. तर दुसऱ्या डावात त्याने सहा बळी घेतले. म्हणजेच आकाश दीपने सामन्यात १० बळी घेतले, जे त्याच्यासाठी एक विशेष कामगिरी होती.

आकाश दीपने हा विजय त्याच्या बहिणीला समर्पित केला.

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर आकाश दीप भावनिक झाला. गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजणाऱ्या त्याच्या बहिणीला त्याने हा विजय समर्पित केला. आकाश दीप म्हणाला, की सामन्यादरम्यान तो जेव्हा जेव्हा चेंडू पकडायचा तेव्हा तो त्याच्या बहिणीच्या चेहऱ्याचा विचार करायचा. आकाशने सांगितले की त्याच्या बहिणीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

आकाश दीपने चेतेश्वर पुजारा यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटले की, ‘मी हे कोणालाही सांगितले नव्हते. माझी मोठी बहीण गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे आणि ती ठीक आहे. ती काहीही करत असली तरी, माझी कामगिरी पाहून तिला सर्वात जास्त आनंद होईल असे मला वाटते. मी जेव्हा जेव्हा चेंडू पकडत होतो तेव्हा त्याचा चेहरा माझ्यासमोर येत होता. मी हा सामना तिला समर्पित करू इच्छितो, मला तिच्या चेहऱ्यावर आनंद पहायचा आहे. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत.’

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल महागलं की स्वस्त झालं? फक्त एका क्लिकमध्ये जाणून घ्या

आकाश दीप हा इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात १० बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. याआधी फक्त चेतन शर्माच हे करू शकले होते. चेतन शर्मा यांनी १९८६ मध्ये एजबॅस्टनच्या त्याच मैदानावर ही कामगिरी केली होती. आता इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आकाश दीपच्या नावावर आहे.

इंग्लंडमधील भारतीय गोलंदाजाचे सर्वोत्तम आकडे (कसोटी सामने)

  • १०/१८७ आकाश दीप, बर्मिंगहॅम २०२५
  • १०/१८८ चेतन शर्मा, बर्मिंगहॅम १९८६
  • ९/११० जसप्रीत बुमराह, ट्रेंट ब्रिज २०२१
  • ९/१३४ झहीर खान, ट्रेंट ब्रिज २००७

परदेशात भारताचे सर्वात मोठे विजय (धावांनी)

  • ३३६ विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम २०२५
  • ३१८ विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड २०१९
  • ३०४ विरुद्ध श्रीलंका, गॉल २०१७
  • २९५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ २०२४
  • २७९ विरुद्ध इंग्लंड, लीड्स १९८६

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment