

ENG vs SL World Cup 2023 In Marathi : मागचा वर्ल्डकप एकदम दिमाखात जिंकणारी इंग्लंड यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पिछाडीवर पडली आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेने जबरदस्त धक्के देत गतविजेत्यांना चकित करून सोडले. फलंदाजीसाठी उपयुक्त असणाऱ्या खेळपट्टीवर लंकेने जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्य 156 धावांत ऑलआऊट केले. चिन्नास्वामी स्टेडियमवर ही कोणत्याही संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.
इंग्लंडचा डाव
जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी पहिल्या गड्यासाठी 45 धावा जोडल्यानंतर इंग्लंडची गळती सुरू झाली. बेअरस्टोने 30 तर मलानने 28 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसुन रजिथा, अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू कुमारा यांनी दमदार गोलंदाजी करत अवघ्या 100 धावांत इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी सर्वाधिक 43 धावांची खेळी केली, पण तोही 31व्या षटकात बाद झाला आणि इंग्लंडच्या आशा मावळल्या. कप्तान जोस बटलरलाही फक्त 8 धावा करता आल्या. इंग्लंडला संपूर्ण संघ 33.2 षटकात 156 धावांत बाद झाला. लंकेकडून कुमाराने सर्वाधिक 3, रजिथा आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – फक्त 35 हजारात मिळेल 95 हजारांचा Oppo चा फोल्डेबल स्मार्टफोन!
दोन्ही संघांची Playing 11 (ENG vs SL)
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद आणि मार्क वुड.
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, चरिता असलंका, धनंजय डिसिल्व्हा, अँजेलो मॅथ्यूज, महिश थिक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मधुशंका.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!