

Ben Stokes’ Injury : भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेतील विजयानंतर श्रीलंकेचे मनोबल उंचावले आहे. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेच्या संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत शतक खेळताना दुखापतग्रस्त झाला. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्ध नॉर्दर्न सुपर चार्जेसकडून खेळताना 33 वर्षीय स्टोक्सने धाव घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाचे स्नायू ताणले. त्याला मैदान सोडावे लागले. दोन धावा केल्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही आणि लवकरच पूर्ण तंदुरुस्त होण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.
Ben Stokes! pic.twitter.com/rf1HJaum5X
— RVCJ Media (@RVCJ_FB) August 12, 2024
द हंड्रेडमधील सामन्यादरम्यान बेन स्टोक्सला दुखापत झाली तेव्हा फिजिओने मैदानात जाऊन त्याची तपासणी केली आणि नंतर त्याला खांद्याचा आधार घेऊन बाहेर आणले. इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराला स्ट्रेचरद्वारे रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या तासाभरानंतर ते स्टेडियमवर परतला. दुखापत झाल्यानंतर स्टोक्स क्रॅचच्या साहाय्याने चालताना दिसला.
हेही वाचा – Paris 2024 Olympics : सुखानंतर दु:ख..! तिला ऑलिम्पिक मेडल दिलं आणि काढून घेतलं
स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने गेल्या महिन्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना 21 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ सप्टेंबरपासून ओव्हलवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत स्टोक्सच्या खेळण्याबाबतचा निर्णय मालिका सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल.
श्रीलंका-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – पहिली कसोटी 21 ते 25 ऑगस्ट – मँचेस्टर
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – दुसरी कसोटी 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर – लॉर्ड्स
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका – पहिली कसोटी 6 ते 10 सप्टेंबर – ओव्हल
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!