‘तो’ एक फोटो व्हायरल झाल्यानंतर कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लोकांनी म्हटलं ‘प्रेरणास्त्रोत’!

WhatsApp Group

मुंबई : पैसा बुडवणारा म्हटलं की आपल्या चेहऱ्यासमोर भारताच्या कर्जबुडव्या आणि घोटाळे केलेल्या व्यक्तींचे चेहरे उभे राहतात. त्यातीलच एक महाभाग म्हणजे विजय मल्ल्या. तो भारतात असेपर्यंत सर्वांना त्याच्यासारखं आयुष्य जगायचं असं वाटत होतं. मात्र तो घोटाळेबाज निघाला असं कळताच सर्वांनी आपलं मत वाऱ्यासारखं बदललं. मल्या पुन्हा एकदा आपल्या गोष्टीमुळं चर्चेत आला. बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज न फेडल्याचा आरोप असलेला फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्या यानं बुधवारी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मल्ल्याला पाहताच लोकांनी त्याला खूप सुनावलं. एकेकाळी ख्रिस गेल मल्ल्याची मालकी असलेला आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळायचा.

मल्ल्या पुन्हा का चर्चेत आला?

प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्याच्या या फोटोवर लोकांनी सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडला. मीम्सही व्हायरल झाले. एका यूजरनं दोन फोटो शेअर करत लिहिलं, ‘टाइम’ त्यानं असं सांगण्याचा प्रयत्न केला, की एक काळ होता जेव्हा मल्ल्या त्याच्या कॅलेंडरमध्ये मॉडेल्ससोबत असायचा. एका यूजरनं मस्करीत म्हटलं, ”तू माझा प्रेरणास्त्रोत आहेस.”

आयपीएलमध्ये गेलच्या नावावर सहा शतकं…

विंडीजचा ओपनर आणि घातक बॅट्समन ख्रिस गेल २०११ ते २०१७ या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. गेलने आयपीएलमधील १४२ सामन्यांमध्ये सुमारे १४९च्या स्ट्राइक रेटनं एकूण ४९६५ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये गेलच्या नावावर सहा शतकं आहेत. त्यानं आयपीएलमध्ये नाबाद १७५ धावांची खेळीही खेळलीय. ख्रिस गेलनं २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध ही मोठी खेळी खेळली, जी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील एखाद्या फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. गेलची नुकतीच अमेरिकेत आयपीएल टीम पंजाब किंग्सची सह-मालक प्रीती झिंटाची भेट झाली. गेल पंजाब किंग्जकडूनही खेळलाय.

मल्ल्या, मोदी आणि चोक्सींकडून भरपाई…

२०१९मध्ये ब्रिटीश न्यायव्यवस्थेनं फरारी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले, परंतु अद्याप त्याला भारतात पाठवलं गेलं नाही. विजय मल्ल्या सोबत नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनीही भारतातून घोटाळ्यांमुळं पलायन केलंय. या तिघांकडून सरकारनं आतापर्यंत १८००० कोटी रुपये वसूल केलेत. हा पैसा बँकांमध्ये परत आल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली होती. या फरार लोकांकडून लवकरात लवकर संपूर्ण रक्कम वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Leave a comment