

Karate Competition : शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने आयोजित केलेल्या शालेय विभागीय कराटे स्पर्धेत 32 वजनी गटात प्रभादेवीच्या कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल येथे शिकणारी सिद्धी मयेकर आणि सेंट अॅग्नेस हायस्कूल येथे शिकणाऱ्या आदिती मण्यार या दोघींनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे त्यांची धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने 28 ते 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा आय़ोजित केली आहे. धुळे येथे 14, 17 आणि 19 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेमार्फत केली जात आहे.
हेही वाचा – दिल्लीत ईडीच्या टीमवर हल्ला! तपास करायला गेली असताना घडली घटना
शालेय विभागीय कराटे स्पर्धा 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पालघर येथे पार पडली. या स्पर्धेत मुंबई विभागाच्या सिद्धी मयेकर आणि आदिती मण्यार यांच्यासह वैष्णव पाटील, आयुष केवट आणि स्तुति शिर्के यांनी रौप्य आणि कांस्य पदक अनुक्रमे पटकावले. विभागीय स्तरावरील विजेते स्पर्धक आता धुळे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी सेन्साई अभिषेक चव्हाण आणि योगेश कांबळी यांच्या उमंग स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी आणि एक्स्ट्रीम शोटोकान कराटे दो रेन्मेईमध्ये कराटेचं प्रशिक्षण घेत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!