महिलेला अश्लील मॅसेज, कॅप्टन्सी गेली आता टिम पेन ऑस्ट्रेलियाचा नवा हेड कोच!

WhatsApp Group

Tim Paine : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि चार दिवसीय सामन्यांसाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. त्यांनी एका खेळाडूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, ज्यावर यापूर्वी एका महिलेलाअश्लील फोटो आणि घाणेरडे संदेश पाठवल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपदही सोडावे लागले.

बिग बॅश लीगमध्ये टिम पेन अॅडलेड स्ट्रायकर्सचा प्रशिक्षक आहत, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे आणि ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे, जे जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि चार दिवसीय सामने खेळतील.

सीएने टिम पेनला ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या अ संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. हा संघ ४ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळेल, त्यापूर्वी तो संघात सामील होईल. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध श्रीलंका अ संघ डार्विनमध्ये ५० षटकांचे ३ सामने खेळेल. त्यानंतर २ चार दिवसीय सामने होतील.

हेही वाचा – BCCI ला दणका..! ज्या टीमला बाहेर काढलं, त्यांनाच द्यावे लागणार ₹५३८ कोटी

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर इंग्लंड लायन्सविरुद्ध चार दिवसांचे सामने खेळले जातील. या काळात टिम ऑस्ट्रेलिया संघासोबतही असेल.

२०१७ मध्ये टिम पेनवर एका महिला सहकाऱ्याला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याचा आरोप होता. ४ वर्षांनंतर, कर्णधारपदाचा राजीनामा देताना, टिम पेनने स्वतः या वादाचा खुलासा केला. पत्रकार परिषदेत त्याने याबद्दल माफी मागितली. त्यानंतर २ वर्षांनी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले.

२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा टिम पेन ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला. त्याने ३५ कसोटी, ३५ एकदिवसीय आणि १२ टी-२० सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे १५३४, ८९० आणि ८२ धावा केल्या.

याशिवाय, त्याने १५४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६४९० धावा केल्या. ८१ टी-२० सामन्यांमध्ये १६४७ धावा केल्या. टिम पेनने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सकडून २ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने फक्त १० धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment