IND vs ENG आधी मोठा वाद! गंभीरने मैदानातच दाखवली ‘कोचगिरी’, ग्राउंड्समनसोबत वाजलं! पाहा Video

WhatsApp Group

Gautam Gambhir Groundstaff Oval Controversy : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हल मैदानावरील हेड ग्राउंड्समन ली फॉर्टिस यांच्यात काल सराव सत्रादरम्यान जोरदार वाद झाला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी हा प्रकार घडल्याने भारतीय संघाच्या वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

काय म्हणाला गंभीर?

सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीर सरावासाठी मिळालेल्या पिच आणि सुविधांवर नाराज होता. वाद एवढा वाढला की, गंभीरने फॉर्टिस यांच्यावर बोट दाखवत “तुम्ही आम्हाला काय करायचं ते सांगू नका” असं थेट सुनावल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – Video : “हा वेग बघून विमानसुद्धा लाजेल!”, चीनच्या मॅग्लेव्ह ट्रेनने तोडलं सर्वांचं गणित!

“हवी तिथे तक्रार करा”

यावेळी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ओव्हलच्या कर्मचाऱ्यांनी यावर अधिकृत तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र गंभीर यांनीही ठामपणे प्रत्युत्तर देत “हवी तिथे तक्रार करा” असा स्पष्ट संदेश दिला.

भारत सध्या २-१ ने मालिकेत पिछाडीवर असून, ३१ जुलैपासून सुरू होणाऱ्या निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी ही घटना संघाच्या तयारीसाठी अडथळा ठरू शकते, असं क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment