WPL 2023 Gujarat Giants vs Mumbai Indians : विमेंस प्रीमियर लीगची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (MIW vs GGT) यांच्यात रंगला. या सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून हरमनप्रीत कौरच्या मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रेक्षकांनी गर्दी केली.
हेली मॅथ्यूज, हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर याच्या दणादण फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २० षटकात ५ बाद २०७ धावा केल्या. मॅथ्यूजने ३ चौकार आणि ४ षटकारासह ४७ धावा तर केरने २४ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. मात्र हरमनप्रीतचे नाव इतिहासात कोरले गेले. तिने या स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकले.
हेही वाचा – रात्री तुमच्या बाईकच्या मागे कुत्रे भुंकतात? स्वत: ला कसं वाचवाल? जाणून घ्या!
हरमनप्रीतने अप्रतिम फटक्यांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले. तिने ३० चेंडूत १४ चौकारांची आतषबाजी केली. मोनिका पटेलने टाकलेल्या १५व्या षटकात हरमनप्रीतने ५ चौकार ठोकले. १७व्या षटकात स्नेह राणाच्या चेंडूवर ती झेलबाद झाली.
Harmanpreet Kaur scored the first fifty of WPL.
Captain leading Mumbai Indians from front, 51* from just 22 balls, What a knock! pic.twitter.com/YY6XScyoxB
— Johns. (@CricCrazyJohns) March 4, 2023
Harmanpreet Kaur, What a player! 🇮🇳 #WPL2023 @ImHarmanpreet pic.twitter.com/uHUjqmFhr0
— Sushant Mehta (@SushantNMehta) March 4, 2023
हरमप्रीत कौरचे एका षटकातील ५ चौकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कप्तान), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.
गुजरात जायंट्स : बेथ मुनी (कप्तान आणि विकेटकीपर), सबिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी.