Harbhajan Singh Sreesanth Slap Video : 2008 चा IPL, क्रिकेटचा पहिला हंगाम आणि त्यात घडलेला एक असा प्रसंग, जो वर्षानुवर्षं गुप्त ठेवण्यात आला होता. ‘ Slapgate’ म्हणून ओळखला जाणारा हरभजन सिंगने श्रीशांतला मारलेली ती बदनामीकारक चापट अखेर 18 वर्षांनी जगासमोर आली आहे. आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी Beyond23 Cricket Podcast मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार मायकेल क्लार्कशी संवाद साधताना हे unseen footage शेअर केलं. या व्हिडीओत मुंबई इंडियन्सच्या हरभजनने किंग्स इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला सामना संपल्यानंतर कानाखाली लगावल्याचे स्पष्ट दिसत आहे.
18 वर्षांनंतर…
“सामना संपल्यानंतर सर्व कॅमेरे बंद झाले होते, पण माझ्या एका सिक्युरिटी कॅमेऱ्यात ती घटना कैद झाली. हे फुटेज मी कधीच बाहेर काढलं नव्हतं. 18 वर्षांनंतर मी ते शेअर करतो आहे,” असं ललित मोदी यांनी स्पष्ट केलं. या घटनेबाबत खुद्द हरभजननेही अलीकडेच दुःख व्यक्त केलं. भारतीय फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनसोबत बोलताना त्याने कबूल केलं.
18 years later, Bhajji – Sreesanth footage released 😳 pic.twitter.com/6jCsOGH3uR
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) August 29, 2025
हेही वाचा – रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! कॅशलेस क्लेम बंद होणार नाही, ‘या’ कंपन्यांची सेवा पूर्ववत सुरू
श्रीशांतची मुलगी म्हणाली..
“माझ्या आयुष्यात एक गोष्ट बदलण्याची संधी मिळाली तर ती श्रीशांतसोबत घडलेली घटना मी नक्कीच हटवेन. त्या घटनेनंतर मी शेकडो वेळा माफी मागितली. पण जेव्हा श्रीशांतची मुलगी मला म्हणाली, ‘’तू माझ्या वडिलांना मारलं होतंस, मला तुझ्याशी बोलायचं नाही’ – तेव्हा माझं मन तुटलं,” असं हरभजन म्हणाला.
या जुन्या आणि खळबळजनक घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा पाऊस सुरु झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांनी दोन्ही खेळाडूंवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!