

Haris Rauf Plane Crash Celebration : एशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नव्हता. मैदानावर पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या वर्तनामुळे सामना एक ‘ड्रामा शो’ वाटू लागला. आधी साहिबजादा फरहानचा गन सेलिब्रेशन, आणि नंतर हारिस राऊफने विमान पाडल्यासारखी अजब अॅक्शन केली, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
हारिस राऊफचे ‘प्लेन क्रॅश’
सामन्यादरम्यान बाउंड्रीवर फील्डिंग करत असताना हारिस राऊफने अचानक दोन्ही हात पसरवून विमानासारखे हालचाल करत ते कोसळल्यासारखं दाखवलं. या कृतीमागे काही प्रकार होता का? की भारताच्या फलंदाजांनी त्याला चिडवलं म्हणून त्याने असं वागणं केलं?
यापूर्वी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्याशी त्याचा वाद झाल्याचंही स्पष्ट झालं. त्या घटनेनंतर लगेचच त्याने हे ‘प्लेन क्रॅश’ सेलिब्रेशन केलं, ज्यावरून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं.
Haris Rauf never disappoints, specially with 6-0. pic.twitter.com/vsfKKt1SPZ
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 21, 2025
विराट कोहलीच्या नावाने स्टेडियम दणाणलं!
जेव्हा हा ‘प्लेन क्रॅश’ व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला, त्याच क्षणी स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांनी **”कोहली-कोहली”**च्या घोषणा दिल्या. हारिस राऊफ काहीच प्रतिक्रिया न देता शांत राहिला.
Indians chanting KOHLI KOHLI after seeing Haris Rauf 🤣🤣🤣#INDvPAK #AsiaCup2025 pic.twitter.com/zL7cRbopQM
— Vinesh Prabhu (@vlp1994) September 21, 2025
खेळात चमकला, पण विजय भारताचाच!
हारिस राऊफने सामना खेळताना 4 षटकांत 26 धावा देऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले आणि पाकिस्तानच्या बाजूने सर्वोत्तम कामगिरी केली. पण या सर्व प्रयत्नांवर भारताच्या फलंदाजांनी पाणी फेरलं. सामना संपला तेव्हा भारताने केवळ 7 चेंडू शिल्लक ठेवून 6 विकेट्सनी विजय मिळवला!
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा