ICC ODI Rankings 2025 : वनडेमध्ये स्पिनर्सचा दबदबा! केशव महाराज बनला जगातील नंबर-1 गोलंदाज

WhatsApp Group

ICC ODI Rankings 2025 : दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज पुन्हा एकदा जगातील नंबर-1 वनडे गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्यानंतर, केशवने महेश तीक्ष्णाला मागे टाकून अव्वल स्थान मिळवलं आहे.

केशव महाराजने 33 धावांत 5 बळी घेतले आणि दोन वर्षांनंतर ICC वनडे रँकिंगमध्ये पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं. याआधी तो 2023 मध्येही नंबर-1 होता. ICC ने 20 ऑगस्ट रोजी वनडे रँकिंग अपडेट केली असून, त्यात टॉप-10 मधील 9 गोलंदाज फिरकीपटू आहेत. न्यूझीलंडचा मॅट हेनरी हा एकमेव वेगवान गोलंदाज टॉप-10 मध्ये आहे.

केशव महाराजने तीक्ष्णाला गाठलं मागे

सध्याच्या रँकिंगनुसार, केशव महाराजकडे 687 रेटिंग पॉइंट्स आहेत, तर श्रीलंकेचा महेश तीक्ष्णा 671 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा कुलदीप यादव 650 पॉइंट्ससह तिसऱ्या स्थानावर असून, त्यानेही अलीकडच्या मालिकांमध्ये भेदक प्रदर्शन केलं आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा 616 पॉइंट्ससह नवव्या क्रमांकावर आहे.

नामीबियाचा स्कोल्ट्जही टॉप-4 मध्ये

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नामीबियाचा फिरकीपटू बर्नार्ड स्कोल्ट्ज ICC रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू पाचव्या, न्यूझीलंडचा मिचेल सॅटनर सहाव्या, तर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झम्पा दहाव्या क्रमांकावर आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजांची परिस्थिती

भारतीय वेगवान गोलंदाज मात्र टॉप-10 मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज अनुक्रमे 13व्या, 14व्या आणि 15व्या स्थानी आहेत.

टेस्टमध्ये बुमराहचा दबदबा कायम

टेस्ट क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने आपली बादशाही टिकवून ठेवली आहे. तो सध्या ICC टेस्ट रँकिंगमध्ये नंबर-1 गोलंदाज आहे. त्याच्या मागे कगिसो रबाडा (द. आफ्रिका) आणि मॅट हेनरी (न्यूझीलंड) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. टॉप-10 मध्ये पाच ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहेत, हेही लक्षवेधी आहे.

T20I मध्ये देखील फिरकीपटूंचीच हवा

T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा जैकब डफी पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा आदिल रशीद दुसऱ्या, भारताचा वरुण चक्रवर्ती चौथ्या, रवि विश्वोई सातव्या, तर अर्शदीप सिंह दहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीतही पाकिस्तानचा कोणताही गोलंदाज टॉप-10 मध्ये नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment