टीम इंडियाला जब्बर धक्का! टेस्टमध्ये ‘ही’ टीम बनली नंबर-1

WhatsApp Group

ICC Team Rankings : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रमवारीत संघाची घसरण झाली आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली असून त्यात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. टीम इंडियाला एका स्थानाचा तोटा झाला आहे. 2021-23 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा विजेता संघ ऑस्ट्रेलियाने कसोटीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संघाने 124 रेटिंग गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे.

ऑस्ट्रेलिया नंबर-1

आयसीसीने नवीनतम आयसीसी क्रमवारी जाहीर केली आणि ऑस्ट्रेलियाचा नंबर-1 कसोटी संघ म्हणून पुष्टी केली. आयसीसीने शुक्रवारी (3 मे) आपली वार्षिक सांघिक क्रमवारी अपडेट केली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील कांगारू संघ गेल्या वर्षी ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतावर 209 धावांनी शानदार विजय मिळवून अव्वल स्थानी पोहोचला.

हेही वाचा – VIDEO : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश! पाहा नेमकं काय झालं

वनडे, टी-20 मध्ये भारताचा दबदबा

वनडे, टी-20 मध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे 122 रेटिंग गुण आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारत 264 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 116 रेटिंग गुण आहेत आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये संघाचे 257 रेटिंग गुण आहेत. वनडेमध्ये दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर टी-20 मध्ये इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment