

IND vs AUS 1st Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत चाहत्यांना खुश केले. ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने अवघ्या 73 धावांत 6 विकेट गमावल्या. त्यावेळी भारताला 100 च्या आत मर्यादित ठेवता येईल असे वाटत होते. ऋषभ पंत (37) आणि नितीश कुमार रेड्डी (41) यांनी संघाला 121 धावांपर्यंत नेले. या धावसंख्येवर पंत बाद झाल्यानंतर भारताने उरलेल्या विकेट्स झटपट गमावल्या. पदार्पणाची कसोटी खेळणारा नितीश रेड्डी हा शेवटचा फलंदाज बाद ठरला.
नितीश संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. याआधी यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल खाते न उघडताच परतले. विराट कोहली 5 धावांची खेळी खेळून बाद झाला तर केएल राहुल 26 धावांची खेळी खेळून बाद झाला. लंच ब्रेकच्या वेळी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल क्रीजवर होते. लंच ब्रेक आणि चहा ब्रेक दरम्यान भारताने 6 विकेट गमावल्या. ध्रुव जुरेल 11 धावा करून आणि वॉशिंग्टन सुंदर 4 धावा करून बाद झाला. यानंतर ऋषभ पंत, हर्षित राणा, जसप्रीत बुमराहही पॅव्हेलियनमध्ये परतले.
That's Stumps on what was an engrossing Day 1 of the 1st #AUSvIND Test!
— BCCI (@BCCI) November 22, 2024
7⃣ wickets in the Final Session for #TeamIndia! 👌👌
4⃣ wickets for Captain Jasprit Bumrah
2⃣ wickets for Mohammed Siraj
1⃣ wicket for debutant Harshit Rana
Scorecard ▶️ https://t.co/gTqS3UPruo pic.twitter.com/1Mbb6F6B2c
What a way to get your maiden Test wicket! ⚡️#DeliveredwithSpeed | #AUSvIND | @NBN_Australia pic.twitter.com/IkykgwUEWW
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
भारताची आग ओकणारी गोलंदाजी
यानंतर भारताचा कप्तान जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा यांनी आग ओकणारी गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 67-7 अशा अवस्थेत डुलते आहे. उस्मान ख्वाजा, नॅथन मॅक्स्वीनी आणि स्टीव्ह स्मिथ आणि कप्तान पॅट कमिन्स यांना एकट्या बुमराहने माघारी धाडले. तर भारताचा शत्रू ट्रॅव्हिस हेडला हर्षितने बोल्ड केले. सिराजने मार्नस लाबुशेन आणि मिचेल मार्श यांचा अडथळा दूर केला. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरी सर्वाधिक 19 धावांवर नाबाद असून त्याच्या साथीला मिचेल स्टार्क उभा आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!