IND vs AUS : कुलदीप यादववर चिडला रोहित शर्मा..! सर्वांसमोर घातल्या शिव्या; पाहा व्हिडिओ!

WhatsApp Group

Rohit Sharma Abuses Kuldeep Yadav : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना सध्या चेन्नईत खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघासाठी हा निर्णय फारसा योग्य नव्हता. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बांधून ठेवले. पण या सामन्यात एक घटना घडली जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आपल्याच संघाच्या खेळाडूवर चिडला.

या सामन्यात टीम इंडियाचा स्टार लेगस्पिनर कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. मात्र या सामन्यात कुलदीपने असे कृत्य केले की कर्णधार रोहित संतापला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 39व्या षटकात कुलदीप गोलंदाजी करत होता. या सामन्यात कुलदीपने आधीच अॅलेक्स कॅरीला बाद केले होते. त्यानंतर शेवटचा चेंडू थेट अॅस्टन अगरच्या पॅडवर गेला.

हेही वाचा – जबरदस्त..! गांधी, आंबेडकर यांचे सेल्फी इंटरनेटवर व्हायरल; नक्की प्रकार काय?

यानंतर कुलदीप आणि संघाच्या खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले. अंपायरने फलंदाजाला नाबाद दिले. पण ही विकेट घेण्यासाठी कुलदीप इतका उत्सुक होता की त्याने रोहित शर्माकडून रिव्ह्यू घेण्याचा आग्रह सुरू केला. रोहितने वारंवार नकार दिला, पण कुलदीप ठाम होता आणि शेवटी रोहितला त्याचे म्हणणे मानावे लागले.

कुलदीपच्या सांगण्यावरून रोहितने रिव्ह्यू घेतला पण त्यानंतर इथूनच गोंधळ झाला. चेंडू स्टंप लाईनच्या बाहेर थोडासा असल्याचे लक्षात आले. त्याने ही गोष्ट रोहितला सांगितली आणि कर्णधार संतापला. लाइव्ह मॅचमध्येच रोहितने कुलदीपला खूप खडसावले. फलंदाज नाबाद असल्याचेही रिव्ह्यूमध्ये दिसून आले.

Leave a comment