

इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारताचे दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले. त्यामुळे निवडकर्त्यांना दुसऱ्या कसोटी (IND vs ENG 2nd Test) सामन्यासाठी टीम इंडियात बदल करावे लागले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्फोटक कामगिरी करणाऱ्या या फलंदाजाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. पाहुण्या संघाने शेवटच्या दोन दिवसांच्या खेळात पलटवार करत भारताविरुद्ध विजयाची नोंद करण्यात यश मिळवले. पहिल्या डावात 246 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ओली पोपने 196 धावांची खेळी करत संघाला सामन्यात पुढे नेले. 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला नवोदित टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्यामुळे केवळ 202 धावा करता आल्या.
टीम इंडियात मोठे बदल
पहिली कसोटी हरल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. मात्र, हा बदल इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे नाही तर खेळाडूंच्या दुखापतीमुळे करण्यात आला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी निवड समितीने वॉशिंग्टन सुंदर आणि सरफराज खान यांच्या नावाची घोषणा केली आहे. आवेश खानची नुकतीच सुटका झाली असून त्याच्या जागी सौरव कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा – PCOD आणि PCOS मध्ये फरक काय? जाणून घ्या महिलांमध्ये होणाऱ्या ‘या’ समस्या कशा ओळखायच्या
गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सरफराज खानला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये निवड समितीने संधी दिली आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध सुरू असलेल्या अनधिकृत कसोटी मालिकेत सरफराजने दुसऱ्या कसोटीत १६१ धावांची शानदार खेळी केली. 2020 रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबईकडून खेळताना सरफराजने 301 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या फलंदाजाने 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 3912 धावा केल्या आहेत ज्यात 14 शतकांचा समावेश आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!