इंग्लंडच्या ‘BAZBALL’चा भारताकडून भुगा, 106 धावांनी जिंकली दुसरी कसोटी!

WhatsApp Group

सहाशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचे धाडस दाखविणाऱ्या इंग्लंड संघाला विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test) पराभवाला सामोरे जावे लागले. या कसोटीत भारताने इंग्लंडचा चार दिवसांत पराभव केला आहे. हा सामना 106 धावांनी जिंकून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

यासह भारताने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आक्रमक वृत्ती दाखवत ‘बॅझबॉल’चे आव्हान उद्ध्वस्त केले. कालच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला होता की, इंग्लिश खेळाडू आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा झाली होती की, भारताने 600 धावांचे लक्ष्य दिले तरी आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सामन्यात 180 षटके शिल्लक आहेत आणि आम्ही 60 किंवा 70 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू.

या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले होते. आजपर्यंत इंग्लंडने चौथ्या डावात एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला नव्हता. 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 292 धावांवर सर्वबाद झाला. भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला. तत्पूर्वी, 143 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेऊन फलंदाजी करताना भारताचा दुसरा डाव 255 धावांवर संपला. शुबमन गिलने शानदार शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 104 धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव 55.5 षटकांत 253 धावांवर आटोपला.

हेही वाचा – पान-मसाला, गुटखा, तंबाखूबाबतचे नियम बदलले, लागू शकतो 1 लाखाचा दंड!

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने 209 धावांची शानदार खेळी केली. यशस्वी जयस्वालने 290 चेंडूंच्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकारांसह कसोटी क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठोकले. इंग्लंडकडून अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. याशिवाय टॉम हार्टलीला 1 बळी मिळाला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment