ओव्हलवर भारताचा ऐतिहासिक विजय! सिराज-कृष्णाची कमाल, 35 धावा असताना पालटला सामना!

WhatsApp Group

India England Oval Test 2025 : लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्याचा शेवटचा दिवस म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक रोमांचक पर्व ठरला. भारताने इंग्लंडला 6 धावांनी पराभूत करत, पाच सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2-2 ने बरोबरीत आणली. या विजयानंतर क्रिकेटप्रेमींच्या हृदयात एकच गोष्ट गूंजत होती, “विजय खेचून आणला!”

इंग्लंडला 374 धावांचे लक्ष्य  

भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या दिवशी इंग्लंडला फक्त 35 धावांची गरज होती, पण भारताला हव्या होत्या फक्त 4 विकेट्स. आणि इथेच मैदानावर अवतरले मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा – दोघांनी मिळून इंग्लंडची आशा पूर्णपणे उध्वस्त केली. सिराजने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले, तर पहिल्या डावात त्याने 4 बळी घेतले होते.  प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावात घेतले 4-4 विकेट्स घेतले. या दोघांच्या यशस्वी कामगिरीमुळे भारताने अविश्वसनीय विजय मिळवला आणि पाच सामन्यांची साखळी बरोबरीत सोडवली.

हेही वाचा – एकदा लागवड, अनेक वर्ष कमाई..‘ही’ शेती शेतकऱ्यांचे भविष्य बदलू शकते!

भारतीय संघाचे कडक कमबॅक

पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत अडचणीत होता, पण शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने शेवटच्या दोन सामन्यांत कमबॅक करत ही मालिका रंगतदार बनवली.

इंग्लंडने लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पाच विकेट्सने विजय मिळवला आणि एजबॅस्टन कसोटीत 336 धावांनी दमदार पुनरागमन केले. इंग्लंडने लॉर्ड्सची ऐतिहासिक लढाई 22 धावांनी रोमांचक जिंकली. भारताने मँचेस्टरमध्ये पुनरागमन केले आणि सामना अनिर्णीत करण्यात यश मिळवले, त्यानंतर त्यांनी पाचवी आणि शेवटची कसोटी जिंकली आणि मालिका बरोबरीत आणली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment