IND vs ENG : इंग्लंडचा दमदार खेळ, भारताचे पाहुण्यांना 230 धावांचे आव्हान!

WhatsApp Group

IND vs ENG World Cup 2023 In Marathi : लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपचा 29वा सामना होत आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी केलेल्या अचुक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने भारताला 229 धावांवर रोखले. भारताकडून कप्तान रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली.

भारताचा डाव

रोहित शर्माने पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली, पण शुबमन गिल स्वस्तात (9) बाद झाला. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने त्याला क्लीन बोल्ड केले. विराट कोहलीने 9 चेंडूंचा सामना केला, पण त्याला खातेही खोलता आले नाही. वोक्सनेच त्याला बाद केले. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू श्रेयस अय्यर 4 धावांची भर घालून बाद झाला. रोहितने केएल राहुलसह भागीदारी केली. या दोघांनी संघाला शतकापार पोहोचवले. राहुल चांगल्या लयीत दिसत होता, पण डेव्हिड विलीने त्याला थांबवले. रोहितच्या रुपात भारताला पाचवा धक्का बसला. आदिल रशीदने त्याला झेलबाद केले. रोहितने 10 चौकार आणि 3 षटकारांसह 87 धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने डाव सांभाळला आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. सूर्याने 4 चौकार आणि एका षटकारांसह 49 धावा केल्या. सूर्या बाद झाल्यावर भारताला जास्त धावसंख्येकडे जाता आले नाही. भारताने 50 षटकात 9 बाद 229 धावा केल्या. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर वोक्स आणि रशीद यांना 2-2 विकेट्स घेता आल्या.

हेही वाचा – इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माचे शतक, सोबत ‘नवा’ रेकॉर्ड!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment