VIDEO : लखनऊमध्ये भारतीय बॉलर्सचा कहर! जो रूट, बेन स्टोक्स शून्यावर बाद

WhatsApp Group

IND vs ENG World Cup 2023 In Marathi : वर्ल्डकपमध्ये भारत इंग्लंडविरुद्ध आपला सहावा सामना खेळत आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोह्हमद शमी या वेगवान भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. बुमराहने लागोपाठ दोन विकेट्स काढत इंग्लंडला हादरे दिले. तर शमीने अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर दबाव टाकत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी केलेल्या अचुक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने भारताला 229 धावांवर रोखले. भारताकडून कप्तान रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावांची खेळी केली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करता इंग्लंडकडून डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांनी सावध सुरुवात केली. पण उसळत्या खेळपट्टीवर त्यांना जास्त काळ तग धरता आला नाही. प्रथम बुमराहने मलानला (16) आणि पुढच्याच चेंडूवर जो रूटला शून्यावर बाद केले. रूटची विकेट पडल्यावर इंग्लंडचा संघ दबावात आला होता. रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या हातात चेंडू सोपवला. त्याने बेन स्टोक्सला हात खोलू दिले नाही. त्यामुळे दबावात येत स्टोक्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो क्लीन बोल्ड झाला. स्टोक्सलाही खाते खोलता आले नाही.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment