IND vs ENG : इंग्लंडने जिंकला टॉस, भारताची पहिली बॅटिंग, वाचा Playing 11!

WhatsApp Group

IND vs ENG Toss Playing 11 In Marathi : वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) मध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात महामुकाबला रंगत आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, असे रोहितने टॉसदरम्यान सांगितले.

इंग्लंड या स्पर्धेचा गतविजेता संघ आहे पण या विश्वचषकात त्यांची मोहीम रुळावरून घसरल्याचे दिसत आहे. इंग्लंड संघाने 5 पैकी फक्त 1 सामना जिंकला असून 4 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड 2 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. आता इंग्लंडला अजून एक पराभव उपांत्य फेरी गाठण्यापासून दूर नेईल.

विराट कोहलीने या विश्वचषकातील एक सामना वगळता सर्व सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळली आहे. गेल्या सामन्यात त्याचे शतक 5 धावांनी हुकले. विराटला सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांचा विक्रम खुणावतो आहे. आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असेल. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रोहितचा हा 100 वा सामना असेल.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment