

IND vs PAK T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघांने पाकिस्तानविरुद्धच्या रंजक सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण भारताचा जसप्रीत बुमराह संपूर्ण पाकिस्तान संघाला जड गेला. भारताने टॉस गमावून प्रथम फलंदाजी केली. पाकिस्ताच्या भेदक माऱ्यासमोर भारत 119 धावांवर ऑलआऊट झाला.
प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून कप्तान बाबर आझम (13) आणि मोहम्मद रिझवान यांनी 35 धावांची सलामी दिली. विकेट पडत नाहीत म्हटल्यावर भारतीय गोलंदाजांनी निर्धाव चेंडूंचा मारा केला. दबाव आल्यानंतर संघाचे स्टार बॅटर विकेट गमावून बसले. रिझवानने सर्वाधिक 31 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 4 षटकात फक्त 14 धावा देत 3 विकेट्स काढल्या. हार्दिक पांड्याने 2 विकेट्स, अर्शदीप सिंहने 1 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली. पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 113 धावा करता आल्या.
🇮🇳 WIN in New York 🔥
— T20 World Cup (@T20WorldCup) June 9, 2024
Jasprit Bumrah's superb 3/14 helps India prevail in this iconic rivalry against Pakistan 👏#T20WorldCup | #INDvPAK | 📝: https://t.co/idMkZgu12N pic.twitter.com/lFsN3Xokmt
हेही वाचा – कार्तिक आर्यनचा ‘फेअरनेस क्रीम’ आणि ‘पान मसाल्याची’ जाहिरात करण्यास नकार
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. थोडासा ओलावा असलेल्या खेळपट्टीचा फायदा घेत पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताला नियंत्रणात ठेवले. हारिस रौफ, मोहम्मद आमिर, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह या जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दोन जीवदाने लाभलेल्या ऋषभ पंतने संघासाठी सर्वाधिक 42 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (13) आणि विराट कोहली (4) बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंतने 6 चौकारांसह झुंज दिली. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेलने 20 धावा केल्या. सूर्यकुमार यादव (7), शिवम दुबे (3), हार्दिक पांड्या (7), रवींद्र जडेजा (0) या फलंदाजांनी सपशेल गुडघे टेकले. पाकिस्तानकडून हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. आमिरने 2 विकेट्स काढल्या. भारताचा संपूर्ण संघ 19 षटकात 119 धावांवर ऑलआऊट झाला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा