IND vs SA : टॅक्सी ड्रायव्हरचं पोरगं आता टीम इंडियासाठी खेळणार…नाव आहे मुकेश कुमार!

WhatsApp Group

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयसचेही संघात पुनरागमन झाले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतही तो खेळला नव्हता. रजत पाटीदार आणि मुकेश कुमार हे संघातील नवे चेहरे आहेत. त्याची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यासह वरिष्ठ खेळाडूंना टी-२० विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेदरम्यान, विश्वचषकासाठी निवडलेला संघ तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.

नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये रजत पाटीदारने शानदार कामगिरी केली होती. त्याचवेळी बंगालकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. राजकोट येथे सुरू असलेल्या इराणी चषक स्पर्धेत न्यूझीलंड-अ आणि भारत-अ विरुद्ध मुकेशने चमकदार कामगिरी केली.

हेही वाचा – Bigg Boss 16 Contestant Sajid Khan : १५व्या वर्षी जेल, दहावीत तीनदा नापास, #MeToo आरोप आणि बरंच काही!

मुकेशचे बॅकग्राऊंड…

मुकेशचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. त्यांनी आपल्या मुलाला घरासाठी मदत करण्यास सांगितले. मुकेश कुमार वयाच्या २०व्या वर्षीच क्रिकेटकडे पाहू लागले. पूर्वी तो रोजच्या कमाईसाठी क्लब क्रिकेट खेळत असे. २०१४ मध्ये, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या चाचण्यांमध्ये प्रथमच त्याच्या गुणवत्तेची ओळख झाली. क्रिकइन्फोशी बोलताना तो म्हणाला होता, की माझी कथा इतर लोकांसारखीच सामान्य आहे. टीम इंडियासाठी खेळणे हे माझे लक्ष्य आहे.

द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा ODI संघ :

शिखर धवन (कप्तान), श्रेयस अय्यर (उपकप्तान), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मो. सिराज, दीपक चहर.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment