IND vs SA Rohit Sharma On Kuldeep Yadav DRS : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रसिध कृष्णा आणि कुलदीप यादव यांच्या अचूक, धारदार गोलंदाजीत संपूर्ण आफ्रिकन संघ 270 धावांवर आवरला. क्विंटन डी कॉकचे शतक असूनही प्रोटियाजची बॅटिंग कोसळत राहिली. दोघांनीही चार-चार विकेट्स घेत भारतीय बॉलिंग आक्रमणाला धार दिली.
या सामन्यात मात्र एक गोष्ट सर्वात जास्त चर्चेत राहिली आणि ती म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव यांच्यातील मैदानावरील धमाल केमिस्ट्री. सामन्यातील 43व्या ते 45व्या ओव्हरदरम्यान जे काही घडलं, ते पाहून प्रेक्षकही थेट हसू लागले!
“तू परत जा…” रोहितचा कुलदीपला खोडकर इशारा
दक्षिण आफ्रिकन डावाचा 43वा ओव्हर सुरू असताना, लुंगी एनगिडीविरुद्ध LBW ची अपील झाल्यानंतर कुलदीप लगेच DRS घेण्यासाठी उत्सुक झाला. त्याने कॅप्टन केएल राहुलकडे पाहून म्हटलं “ले ना… दोन रिव्यू शिल्लक आहेत!” तेवढ्यात स्लिपमध्ये उभा असलेला रोहित शर्मा हाताने इशारा करत म्हणाला, “अरे तू परत जा!” यावर विराट कोहलीही मिड-विकेटवरून मोठ्याने हसू लागला. रोहित आणि कोहली दोघांनीही कुलदीपची मस्करी केली.
Reaction of Rohit Sharma & Virat Kohli when Kuldeep Yadav asked for a review…😂 #INDvsSA pic.twitter.com/vnqeJ8zUPF
— Jara (@JARA_Memer) December 6, 2025
कुलदीप तर अक्षरशः पाय ओढत मार्ककडे जाताना लोकांना दिसत होता, जणू त्याला कळत होतं की त्याचा रिव्यू फेल जाणारच आहे.
45व्या ओव्हरमध्ये तर मर्यादा पार!
पुढच्या म्हणजे 45व्या ओव्हरमध्ये पुन्हा एक मोठी अपील झाली. अंपायरने बॅटरच्या बाजूने निर्णय दिला आणि कुलदीपने पुन्हा एकदा रिव्यूसाठी हात वर केला. यावेळी तर रोहित हसू आवरूच शकला नाही!
Their bond are top notch
— Akhil (@crickfever00) December 6, 2025
Kuldeep yadav and Rohit sharma are love to watch 😄 ❤️#INDvsSA #kuldeepyadav #RohitSharmapic.twitter.com/TbtYO3DHch
रिप्ले दाखवताच सगळं स्पष्ट… रोहित तीनही वेळा 100% बरोबर!
कुलदीपच्या पुढच्या ओव्हरमध्येही एनगिडी पूर्णपणे बीट झाला पण रिव्यू घेऊ नको असा सल्ला पुन्हा दिला गेला. जेव्हा रिप्ले दाखवण्यात आले, तेव्हा स्पष्ट झाले की रोहितने प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतला होता आणि कुलदीपचा रिव्यू वाया गेला असता.
हा संपूर्ण प्रसंग भारतीय संघातील बॉंडिंग, मजा आणि मैत्रीचे एकदम परफेक्ट उदाहरण ठरला. सामना जिंकण्याइतकंच हे FUN MOMENTS ही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!