

IND vs SL World Cup 2023 In Marathi : रोहित शर्माच्या नेतृत्वात सुसाट खेळणाऱ्या भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये आपल्या सातव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 358 धावांचे आव्हान दिले आहे. लंककेडून दिलशान मदुशंकाने भारताचा अर्धा संघ गारद केला. प्रत्युत्तरात लंकेचा संपूर्ण संघ फक्त 55 धावांत आटोपला. आशिया कपच्या अंतिम सामन्यात याच श्रीलंकेला भारताने 50 धावात ऑलआऊट केले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.
भारताचा डाव
या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत दिमाखात खेळणाऱ्या रोहितला केवळ 4 धावा करता आल्या. डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चेंडूवर रोहित क्लीन बोल्ड झाला. वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाच्या धोकादायक चेंडूचे रोहितकडेही उत्तर नव्हते. मधुशंका आणि कसुन रजिथाने दमदार गोलंदाजी करत विराट आणि शुबमनला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनी सावध फलंदाजी करत हळूहळू भागीदारी रचली. दोघांनीही संघाला दोनशेच्या जवळ पोहोचवले. दोघांचीही शतके हुकली. मधुशंकाने प्रथम शुबमनला 92 धावा (11 चौकार आणि 2) आणि विराटला 88 (11 चौकार) धावांवर रोखले. त्यानंतर आलेले केएल राहुल (21) आणि सूर्यकुमार यादव (21) स्वस्तात बाद झाले. श्रेयस अय्यरने घरच्या प्रेक्षकांना नाराज केले नाही. त्याने 6 आणि 3 चौकारांची आतषबाजी करत 70 धावांची सुंदर खेळी केली. मदुशंकाने त्याच्या रुपात आपली पाचवी विकेट घेतली. त्याने आपल्या 10 षटकात 80 धावा खर्च केल्या. भारताने 50 षटकात बाद धावा फलकावर लावल्या.
हेही वाचा – वानखेडेवर मोठी चूक? चुकून स्टीव्ह स्मिथच्या पुतळ्याचे अनावरण?
श्रीलंकेचा डाव
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यापूर्वीच श्रीलंकेने गुडघे टेकले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनी तिखट मारा करत फक्त 14 धावांत अर्धा संघ गारद केला. लंकेचे पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, दुशान मधुशंका आणि दुष्मंथा चमीरा यांना खातेही उघडता आले नाही. शमीने या स्पर्धेत दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याची किमया केली. लंकेचा संपूर्ण संघ फक्त 19.4 षटकात 55 धावांत ऑलआऊट झाला. शमीने 18 धावांत 5, सिराजने 16 धावांत 3, बुमराह आणि जडेजा यांनी 1-1 विकेट घेतली.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!