

IND vs WI 1st T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला रंगत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजची कप्तान हेली मॅथ्युजने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्सच्या अप्रतिम अर्धशतकांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला 196 धावांचे आव्हान दिले आहे.
भारताचा डाव
सलामीवीर स्मृती मंधाना आणि उमा छेत्री यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. विंडीजची फिरकीपटू करिश्मा रामहारकने उमाला बोल्ड करत ही जोडी फोडली. उमाने 4 चौकारांसह 24 धावा केल्या. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्सने स्मृतीसह धावगती वाढवली. दोघींनी 12व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. 14व्या षटकात स्मृतीने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर ती बाद झाली. तिने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या. स्मृतीनंतर जेमिमाहनेही झटपट अर्धशतक साकारले. 20व्या षटकात ती धावबाद झाली. जेमिमाहने 35 चेंडूत 73 धावा केल्या, तिने 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले. हरमनप्रीत 13 धावांवर नाबाद राहिली. भारताने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. विंडीजकडून करिश्मा रामहारकने 2 विकेट्स काढल्या.
𝗜. 𝗖. 𝗬. 𝗠. 𝗜
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2024
In the arc and then, Smriti does the rest! 👏 👏
A cracking MAXIMUM 👌 👌
Live ▶️ https://t.co/0G6LQ3gSPB#TeamIndia | #INDvWI | @mandhana_smriti | @IDFCFirstbank pic.twitter.com/XihQW052aw
Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2024
A solid batting display from #TeamIndia 💪 💪
7⃣3⃣ for Jemimah Rodrigues
5⃣4⃣ for vice-captain Smriti Mandhana
Over to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/0G6LQ3gSPB#INDvWI | @JemiRodrigues | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/v7gon5ECvQ
दोन्ही संघांची Playing 11
भारत – स्मृती मंधाना, उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, राधा यादव, साइमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग
वेस्ट इंडिज – हेली मॅथ्यूज (कप्तान), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, शबिका गजनबी, ऍफी फ्लेचर, जैदा जेम्स, मँडी मंगरू, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!