

IND vs WI 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना डीवाय पाटील स्टेडियमवर रंगत आहे. विंडीजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. पाहुण्या संघाची कंटाळवाणी फिल्डिंग आणि स्मृती मंधानाला मिळालेल्या 3 जीवदानाच्या जोरावर भारताने 160 धावांचे लक्ष्य दिले.
भारताकडून स्मृती मंधानाने मालिकेतील लागोपाठ दुसरे अर्धशतक ठोकले. एका बाजूने डाव गडगडत असताना स्मृतीने डावाला आकार दिला. अर्धशतकापूर्वीच भारताने उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स आणि पदार्पणवीर राघवी बिश्त यांना स्वस्तात गमावले. पण स्मृतीने किल्ला लढवला. तिने 9 चौकार आणि एका षटकारासह 62 धावांची खेळी केली. 14व्या षटकात ती बाद झाली. त्यानंतर शेवटच्या षटकात रिचा घोषने झटपट धावा जमवल्या. रिचाने 16 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, चिनेल हेन्री आणि एफी फ्लेचर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताने 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – स्मृती मंधाना (कप्तान), उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, राघवी बिस्त, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, साइमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिज – हेली मॅथ्यूज (कप्तान), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, झैदा जेम्स, एफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, अश्मिनी मुनिसार.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!