

IND vs WI 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांमधील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज 17 डिसेंबर रोजी नवी मुंबईत खेळवला जात आहे. याच डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली आणि कॅरेबियन संघाविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये विजयाची मालिका नऊ सामन्यांपर्यंत वाढवली.
मागच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतच्या जागी मैदानात आलेल्या मीनू मनीने चमकदार कामगिरी केली. मात्र, वेस्ट इंडिजच्या डावात हरमनप्रीतने बहुतांश वेळ क्षेत्ररक्षण का केले नाही, हे संघाने स्पष्ट केले नाही. आज ती दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याचे कळते. स्मृती मंधाना नेतृत्व करत आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका नावावर करण्याच्या विचारात असेल.
Update: Ms Harmanpreet Kaur sustained a niggle in her knee while batting during the first T20I against West Indies. Hence, she remains unavailable for selection for the second T20I.
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
The BCCI Medical Team is monitoring her progress. https://t.co/EPnBuST4BK
दोन्ही संघांची Playing 11
भारत – स्मृती मंधाना (कप्तान), उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, राघवी बिस्त, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, साइमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिज – हेली मॅथ्यूज (कप्तान), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, झैदा जेम्स, एफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, अश्मिनी मुनिसार.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!