

IND vs WI : विंडीजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत फक्त रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे.
युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी यशस्वीला स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांचीही वनडे संघात निवड झाली आहे.
हेही वाचा – दिवसा वीज स्वस्त, रात्री महाग! मोदी सरकार ‘मोठं’ पाऊल उचलण्याच्या तयारीत
🚨 JUST IN: India have named their squads for the Test and ODI series against West Indies.
Details 👇 https://t.co/CYqtZSDmiq
— ICC (@ICC) June 23, 2023
कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल. युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
विंडीज दौरा
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.
वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना – 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
- दुसरा कसोटी सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
- पहिली वनडे – 27 जुलै, ब्रिजटाऊन
- दुसरी वनडे – 29 जुलै, ब्रिजटाऊन
- तिसरी वनडे – 15 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
हेही वाचा – औषधं बनवणाऱ्या कंपन्या येणार गोत्यात? केंद्र सरकारकडून सर्वात मोठी कारवाई!
- पहिला टी-20 सामना – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
- दुसरा टी-20 सामना – 6 ऑगस्ट, गयाना
- तिसरा टी-20 सामना – 8 ऑगस्ट, गयाना
- चौथा टी-20 सामना – 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
- पाचवा टी-20 सामना – 13 ऑगस्ट, फ्लोरिडा
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!