

IND vs WI 2nd T20I : वेस्ट इंडिजची धडाकेबाज कॅप्टन हेली मॅथ्युजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 9 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. पहिला टी-20 सामना गमावलेल्या विंडीजने जागे होत आपल्या पात्रतेच्या लायक खेळ दाखवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विंडीजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली.
भारताची कप्तान स्मृती मंधानाने तीन जीवदानांचा फायदा घेत मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक साकारले. तिच्या धावांच्या जोरावर भारताने विंडीजसमोर 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. स्मृतीने 9 चौकार आणि एका षटकारासह 62 धावांची खेळी केली. विकेटकीपर रिचा घोषने 16 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, चिनेल हेन्री आणि एफी फ्लेचर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Windies beat India by 9 wickets and level the series 1-1.
— Female Cricket (@imfemalecricket) December 17, 2024
A solid win with 26 balls to spare 🔥 #CricketTwitter #INDvWI pic.twitter.com/KanXc5312I
भारताच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने आक्रमकता दाखवली. सलामीवीर कियाना जोसेफने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 38, हेली मॅथ्युजने 16 चौकारांसह नाबाद 81, शेमाइन कॅम्पबेलने 4 चौकारांसह नाबाद 29 धावा करत भारताच्या गोलंदाजांना चौफेर फटके हाणले. 15.4 षटकातच विंडीजने भारताचे आव्हान पूर्ण केले. सुमार क्षेत्ररक्षणाचा भारतालाही तोटा सहन करावा लागला.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – स्मृती मंधाना (कप्तान), उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, राघवी बिस्त, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, साइमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिज – हेली मॅथ्यूज (कप्तान), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, झैदा जेम्स, एफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, अश्मिनी मुनिसार.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!