IND vs ZIM 1st ODI : टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. आज या मालिकेचा पहिला सामना खेळवला जाईल. या मालिकेपूर्वी सर्वांचं लक्ष भारतीय कर्णधार केएल राहुलच्या फॉर्म आणि फिटनेसवर असेल. टीम इंडिया या दौऱ्यावर पाच स्पेशालिस्ट सलामीवीरांसह दाखल झाली आहे. कर्णधार केएल राहुलशिवाय, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि शुबमन गिल हे देखील संघाचा भाग आहेत, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळतं हे पाहणं बाकी आहे.
राहुलवर नजरा!
टी-२० फॉरमॅटमध्ये भारताच्या टॉप ऑर्डरचा अविभाज्य भाग मानला जाणारा राहुल या मालिकेत आपली ओळखीची लय पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करेल. हर्नियाच्या ऑपरेशनमुळं राहुल दोन महिन्यांनी संघात परतला. टी-२० संघातील सलामीवीराची भूमिका कायम ठेवण्याचं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी करण्याचं आव्हान त्याच्यासमोर असेल. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांची केवळ राहुलच्या धावांवर नजर राहणार नाही, तर धावा कशा होतात हेही पाहावं लागेल.
Preps ✅
Smiles 🔛
One day away from the first #ZIMvIND ODI! 👍 👍#TeamIndia pic.twitter.com/iIN1poVC6N
— BCCI (@BCCI) August 17, 2022
हेही वाचा – अवघ्या १००० रुपयांवर आलीय विनोद कांबळीची कमाई! म्हणाला, “मला नोकरी…”
टी-२० विश्वचषक यंदा खेळवला जाणार आहे आणि अशा परिस्थितीत वनडेचं महत्त्व थोडं कमी झाले आहे. मात्र, अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवीन खेळाडूंना संधी मिळणार असून त्यांना या मालिकेत आपली छाप सोडायला नक्की आवडेल. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि विराट कोहलीही खेळत नाहीत.
आशिया चषकापूर्वी परीक्षा
भारतीय संघाला आशिया चषकात २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये नुकतेच झिम्बाब्वेने बांगलादेशसमोर ३०० आणि २९० धावांचे लक्ष्य ठेवले. अशा स्थितीत राहुल, शिखर धवन, शुबमन गिल, दीपक हुडा आणि संजू सॅमसन मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतील. भारताकडं मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर आणि कुलदीप यादवसारखे गोलंदाज आहेत तर शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेलसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत.
— BCCI (@BCCI) August 17, 2022
संघ खालीलप्रमाणे
भारत: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि शाहबाज अहमद.
हेही वाचा – मित्राला भेटायला गेला आणि फसला..! ‘तो’ प्रकार पाहून रोहित शर्मानं कपाळावर मारला हात; पाहा VIDEO
झिम्बाब्वे : रेगिस चकाबवा (कर्णधार), रायन बुर्ले, तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट केया, टी कैटानो, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली एम, टी मारुमनी, जान मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड अंगारवा, व्हिक्टर एन, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.
सामन्याची वेळ : दुपारी १२:४५ पासून
सामन्याचं ठिकाण : हरारे स्पोर्ट्स क्लब
कुठं पाहता येईल सामना : सोनी स्पोर्ट्स, सोनी लिव