IND vs ZIM 1st ODI : मराठी खेळाडूला बाहेर ढकलत भारताचा ‘हा’ स्टार करणार डेब्यू? ‘अशी’ असू शकते Playing 11!

WhatsApp Group

IND vs ZIM 1st ODI : भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना आज (१८ ऑगस्ट) होणार आहे. हरारे येथे होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता सुरू होईल. भारत आणि झिम्बाब्वेचे संघ ६ वर्षांनंतर आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांतील यांच्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २२ जून २०१६ रोजी झाला होता. त्यानंतर भारतानं हरारे टी-२० सामना ३ धावांनी जिंकला.

त्रिपाठी आत, तर बाहेर कोण?

मालिकेतील या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय कर्णधार केएल राहुल त्याच्या प्लेइंग-११ मध्ये राहुल त्रिपाठीला संधी देऊ शकतो. असे झाल्यास राहुल त्रिपाठीचा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना असेल. राहुल त्रिपाठीला संधी देण्यासाठी मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडला बाहेर बसवलं जाऊ शकतं.

राहुल चौथ्या क्रमांकाला…

शुबमन गिल सलामीला शिखर धवनसोबत सुरुवात करताना दिसू शकतो. कर्णधार राहुल स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. तर इशान किशन किंवा संजू सॅमसन यापैकी एकाला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळण्याची खात्री आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि आवेश खान कमांड सांभाळताना दिसतील. दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी मिळू शकते. फिरकी विभागाबद्दल बोलायचं झालं तर अक्षर पटेलसह कुलदीप यादवची जोडी मैदानात उतरू शकते. दीपक हुडा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणूनही दिसू शकतो. अशा परिस्थितीत बांगलादेशला सलग दोन मालिकांमध्ये (वनडे, टी-२०) पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेचं आव्हान सोपं नसेल.

टीम इंडियाची संभाव्य Playing 11

शिखर धवन, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड/राहुल त्रिपाठी, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन/इशान किशन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर/दीपक चहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा/आवेश खान.

दोन्ही संघ :

भारत: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि शाहबाज अहमद.

झिम्बाब्वे : रेगिस चकाबवा (कर्णधार), रायन बुर्ले, तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट केया, टी कैटानो, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली एम, टी मारुमनी, जान मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड अंगारवा, व्हिक्टर एन, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment