IND vs NZ : भारत 46 धावांवर ऑलआऊट! 5 खेळाडू शून्यावर, न्यूझीलंडचा भेदक मारा

WhatsApp Group

India All Out For 46 : मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्कीच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय संघ फक्त 46 धावांवर ऑलआऊट झाला. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर गुडघे टेकेले.

विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. कप्तान रोहित शर्मा फक्त 2 धावांवर माघारी परतला. ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. न्यूझीलंडने 31.2 षटकात भारताला 46 धावांत गुंडाळले. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने 15 धावांत 5 तर ओरूर्कीने 22 धावांत 4 विकेट्स काढल्या. टीम साऊदीला एक विकेट घेता आली.

हेही वाचा – मुकेश अंबानींकडून 37 लाख शेअरधारकांना दिवाळी भेट!

कसोटीत भारतातील सर्वात कमी धावसंख्या

46 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, 2024*
62 – न्यूझीलंड विरुद्ध भारत, मुंबई, 2021
75 – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली, 1987
76 – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, 2008
79 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, नागपूर, 2015

कसोटीत भारतासाठी सर्वात कमी धावसंख्या

36 – वि. ऑस्ट्रेलिया, ॲडलेड, 2020
42 – वि. इंग्लंड, लॉर्ड्स, 1974
46 – वि. न्यूझीलंड, बंगळुरू, 2024*
58 – वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 1947
58 – वि. इंग्लंड, मँचेस्टर, 1952

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment