

Vinesh Phogat Wrestling World Championships : स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. विनेश ही जागतिक चॅम्पियनशिपच्या इतिहासात दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला आणि एकूणच दुसरी भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. विनेशनं बुधवारी कांस्यपदकावर कब्जा केला. ही जागतिक स्पर्धा सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे खेळवली जात आहे. यावेळी विनेशला सुवर्णाची अपेक्षा होती, परंतु महिलांच्या फ्रीस्टाइल ५३ किलो वजनी गटात पात्रता फेरीत तिला मंगोलियाच्या खुल्लान बटखुयागकडून ०-७ असा पराभव पत्करावा लागला.
पण आता तिनं शानदार पुनरागमन करत ५३ किलो वजनी गटातील रेपेचेज सामन्यात स्वीडनची कुस्तीपटू एम्मा जोआना माल्मग्रेनचा ८-० असा पराभव केला. यासह विनेशनं कांस्यपदक जिंकलं. याआधी तिनं २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर कझाकिस्तानमधील नूर सुलतान येथे ही जागतिक स्पर्धा पार पडली.
🎊 Congratulations to Vinesh Phogat on Clinching First Medal for India at World Wrestler Championship!
🥉 Vinesh Phogat wins the BRONZE Medal after defeating Sweden's Joana Malmgren 8-0
Best wishes to @Phogat_Vinesh on this day as she gears up to capture the future! #wrestling pic.twitter.com/6gwTVW8KOL— ALLEN Career Institute (@ALLENkota) September 15, 2022
हेही वाचा – IPL स्पॉट फिक्सिंग, मुंबई मॉडेल, कपडे विक्री आणि पाकिस्तानी अंपायर असद रौफ!
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्ण
अलीकडेच, विनेश फोगाटनं बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकलं. नॉर्डिक पद्धतीच्या आधारे तिनं ती स्पर्धा जिंकली. विनेशनं वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती कॅनडाची कुस्तीपटू समंथा ली स्टीवर्टविरुद्धचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर विनेशनं तिच्या दुसऱ्या सामन्यात नायजेरियाच्या मर्सी बोलाफुनोलुवा अडेकुरोआचा तर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या केश्नी मदुरावाल्गेचा पराभव केला.
Vinesh Phogat opened India's account at the Wrestling World Championships in Belgrade, claiming her 2nd bronze medal in the world meet on Wednesday, September 14. #indianwrestlers #vineshphogat #worldwrestlingchampionship @Phogat_Vinesh pic.twitter.com/T6hw8dTDlK
— The Logical Indian (@LogicalIndians) September 15, 2022
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत गुडघ्याच्या दुखापतीमुळं विनेश फोगाटच्या पदक जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याचवेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ती शेवटच्या आठ टप्प्यातून बाहेर पडली होती. या दोन घटनांमुळं ती कुस्ती सोडणार होती, परंतु नंतर तिनं जोरदार पुनरागमन केलं.