IPL 2023 Final : अहो जय शाह, हे काय करताय? ‘तो’ प्रकार कॅमेऱ्यात कैद!

WhatsApp Group

IPL 2023 Final GT vs CSK Jay Shah : आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, 28 मेचा दिवस पावसाने वाहून गेला. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजय मिळाला.

जय शाहंचा व्हिडिओ व्हायरल!

या सामन्यादरम्यान BCCI सचिव जय शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईला विजयासाठी 4 चेंडूत 12 धावा हव्या असतानाचा आहे. शाह यांची रिअॅक्शन पाहून नेटिझन्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – IPL 2023 Final : आणि काय पाहिजे…! सर रवींद्र जडेजाला धोनीनं घेतलं उचलून; पाहा Video

चेन्नई सुपर किंग्जचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 214 धावा केल्या. त्यानंतर पावसाने हस्तक्षेप करून अडीच तासांचा खेळ वाया घालवला. सामना 12.10 वाजता पुन्हा सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूत तीन धावा झाल्या. यानंतर CSK ला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. रवींद्र जडेजा स्ट्राइकवर होता. जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला. या विजयासह चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावण्याच्या मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment