

IPL 2023 Arjun Tendulkar Six To Mohit Sharma : अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 पासून टी-20 लीग करिअरला सुरुवात केली. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गुजरात टायटन्सविरुद्ध (GT vs MI) गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली. पण त्याचा संघ मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. अर्जुनने 2 षटकात 9 धावा देत वृध्दिमान साहाची विकेट घेतली. टायटन्सने प्रथम खेळताना 6 बाद 207 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात 5 वेळचा चॅम्पियन मुंबई संघ 9 विकेट्सवर 152 धावाच करू शकला. अर्जुन तेंडुलकर 9व्या क्रमांकावर उतरला आणि त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर मोठा षटकार ठोकला.
मोहित शर्माने IPL 2023 मधून शानदार पुनरागमन केले आहे. हा वेगवान गोलंदाज आतापर्यंत 2 वेळा सामनावीर म्हणून निवडला गेला आहे. मोहित मुंबई इंडियन्सच्या डावातील 20 वे षटक टाकत होता. पहिला चेंडू त्याने बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. अर्जुन तेंडुलकरने लेग साइडवर 77 मीटरचा षटकार मारला. षटकारानंतर मोहितला विश्वासच बसत नव्हता. मात्र, षटकातील चौथ्या चेंडूवर मोहितने त्याला पायचीत केले. अर्जुनने 9 चेंडूत 13 धावा केल्या. अर्जुनला आयपीएलमध्ये पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळाली.
Arjun aims BIG 🎯#GTvMI #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 pic.twitter.com/cF4DZVviUm
— JioCinema (@JioCinema) April 25, 2023
हेही वाचा – Horoscope Today : मिथुन राशीच्या लोकांना लाभ, जाणून घ्या आजचा चंद्र मंगळ योग तुमच्या राशीवर कसा प्रभाव टाकेल
— Guess Karo (@KuchNahiUkhada) April 26, 2023
4 सामन्यात 3 बळी
23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने IPL 2023 मध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले असून 3 विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याला केकेआरविरुद्ध एकही विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्यात त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 18 धावांत एक विकेट घेतली. त्यानंतर पंजाब किंग्जविरुद्ध 48 धावांत एक विकेट आणि आता गुजरात टायटन्सविरुद्ध 9 धावांत एक विकेट घेतली. अर्जुन तेंडुलकरच्या एकूण T20 विक्रमावर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 15 विकेट घेतल्या आहेत. 10 धावांत 4 बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!