IPL 2023 : अद्भूत कॅच..! मोहित शर्माचा कारनामा पाहून सर्व थक्क; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 Mohit Sharma Catch : आयपीएल 2023चा 39 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ईडन गार्डन्सवर रंगला. या रोमांचक सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने आश्चर्यकारक झेल घेत सर्वांनाच चकित केले आहे. केकेआरच्या फलंदाजीदरम्यान पाचव्या षटकात मोहितने हा सुंदर झेल टिपला. गुजरातकडून मोहम्मद शमी हे षटक टाकत होता.या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर त्याच्यासमोर फलंदाजीसाठी सज्ज झाला.

शार्दुल ठाकूरने शेवटच्या चेंडूवर पूर्ण ताकदीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क न झाल्याने चेंडू हवेत उसळला. दरम्यान, मैदानात चांगली तयारी केलेल्या मोहित शर्माने लांब धावत असताना विरुद्ध दिशेने डायव्हिंग करताना हा झेल घेऊन सर्वांनाच चकित केले.

हेही वाचा – Video : मराठी क्रिकेटर माणूसकी विसरला..! रोहितच्या बर्थडे पार्टीतील घटना; पाहा!

या सामन्यातील शार्दुल ठाकूरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, संघाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर मोठ्या आशेनेफलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, परंतु तो संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. त्याने एकूण चार चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता मोहम्मद शमीचा बळी ठरला.

असा रंगला सामना…

या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाताने गुजरातला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 13 चेंडू राखून पूर्ण केले. गुजरात टायटन्सच्या विजयाचा हिरो ठरला विजय शंकर, ज्याने नाबाद 51 धावा केल्या. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ आता या विजयासह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, कोलकाता संघाने आतापर्यंत 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment