

IPL 2023 MI vs PBKS Arjun Tendulkar Yorker : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन तेंडुलकची जागा आता पक्की होत आहे. शिवाय अर्जुनही आपली चमक दाखवत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने शेवटच्या षटकात धावसंख्येचा बचाव करत संघाला विजय मिळवून दिला. त्या षटकात अर्जुनने भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात अर्जुनचे अचूक यॉर्कर टाकत प्रभसिमरस सिंहची विकेट घेतली.
बॅटखाली बॉल!
पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जने झंझावाती सुरुवात केली. अर्जुनने पहिल्या षटकात केवळ 5 धावा दिल्या. मात्र त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला गोलंदाजी दिली नाही. 6 षटकांनंतर पंजाबची धावसंख्या एका विकेटवर 58 अशी होती. अथर्व प्रभसिमरन सिंहसोबत क्रीजवर राहिला. अर्जुन 7 वे षटक घेऊन आला. दुसऱ्या चेंडूवर अथर्वने त्याला चौकार ठोकला. चौथ्या चेंडूवर अर्जुनने प्रभसिमरनला अचूक यॉर्कर टाकत पायचीत पकडले.
हेही वाचा – IPL 2023 : शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स..! मोहित शर्मा ठरला गुजरातचा हिरो; लखनऊचा वाईट खेळ
YORKED!
Arjun Tendulkar gets Prabhsimran Singh out with a ripper 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/W3kIQZ7Xyq
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
केकेआरविरुद्ध पदार्पण
अर्जुन तेंडुलकर तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे पण त्याला खेळण्याची संधी मिळत नव्हती. याच मोसमात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या संघाच्या चौथ्या सामन्यात अर्जुनला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. कर्णधार रोहित शर्माने त्याला फक्त दोन षटके टाकण्याची संधी दिली. हैदराबादविरुद्ध त्याने 2.5 षटकांत 18 धावांत एक बळी घेतला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!