IPL 2024 CSK vs RCB : रहाणे 3.0…! रचिनसोबत ‘रिले’ कॅच, विराट कोहलीचा खेळ खल्लास, पाहा Video

WhatsApp Group

CSK vs RCB Rahane+Ravindra Catch : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कप्तान फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केली. पण सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने त्याला थांबवले. फाफची विकेट गेल्यानंतर रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल यांना खातेही खोलता आले नाही.

त्यानंतर विराट कोहली आणि कॅमेरुन ग्रीन यांनी स्कोअरबोर्ड हलवला. विराटने 21 तर ग्रीनने 18 धावा केल्या. ऋतुराजने परत मुस्तफिजुरला चेंडू सोपवल्यानंतर त्याने दोघांना बाद केले. यात विराटची विकेट खास ठरली, ती रहाणे, रचिनच्या झेलमुळे. डिप मिड विकेटवरून उजवीकडे स्लाईड मारत रहाणेने हा झेल घेतला, पण सीमारेषेला पाय लागण्यापूर्वी रहाणेने चेंडू रचिन रवींद्रकडे टाकला.

हेही वाचा – IPL 2024 CSK Vs RCB : रचिन रवींद्रचा कमाल कॅच..! पहिल्याच मॅचमध्ये सुपरमॅन, पाहा VIDEO

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment