

IPL 2024 DC vs KKR : आयपीएल 2024 चा 16 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. ऋषभ पंतचा दिल्ली संघ विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली आणि कोलकाता यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दिल्लीने 15 सामने जिंकले आहेत तर कोलकाताने 16 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला. आता आजच्या सामन्यात दिल्ली हे अंतर कमी करण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहायचे आहे.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद.
कोलकाता नाइट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंह, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा