

IPL 2024 GT vs MI Jasprit Bumrah Yorker | इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 5 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या जुन्या संघ गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातविरुद्धच्या या सामन्यात हार्दिकने मुंबईसाठी पहिले षटक टाकले, पण त्याला शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांच्याकडून मार खावा लागला.
गिल आणि साहा यांनी मिळून पहिल्या षटकात 2 चौकारांसह एकूण 11 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने चेंडू जसप्रीत बुमराहकडे सोपवला. बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकत वृद्धिमान साहाची दांडी गूल केली. साहाने 19 धावा केल्या. बुमराहने आपल्या पहिल्या षटकात 4 धावा दिल्या.
हेही वाचा – IPL 2024 RR Vs LSG : राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी विजय, संजू सॅमसनचा रोहित शर्माला छोबीपछाड!
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्समध्ये नमन धीर, जेराल्ड कोएत्झी आणि शम्स मुलानीला संधी देण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये अजमतुल्ला ओमरझाई, स्पेन्सर जॉन्सन आणि उमेश यादव पदार्पणाचा सामना खेळत आहेत.
दोन्ही संघाची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पीयुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, लूक वूड.
गुजरात टायटन्स – शुभमन गिल (कप्तान), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा