

IPL 2024 MI vs RCB Jasprit Bumrah hugged Rohit Sharma : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे, ज्यामध्ये एमआयचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात आरसीबीने 197 धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने 40 चेंडूत 61 धावा केल्या. तर रजत पाटीदारने 26 चेंडूत 50 धावा केल्या.
यानंतर अखेरीस दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 21 धावांत सर्वाधिक 5 बळी घेतले. जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. बंगळुरूने 20 षटकात 8 बाद 196 धावा केल्या.
बुमराहची रोहितला मिठी..
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा पाच विकेट घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहने रोहित शर्माला मिठी मारली. रोहितने त्याला उचलूनही घेतले. जसप्रीत बुमराह आता आयपीएल 2024 चा नवा पर्पल कॅप होल्डर बनला आहे.
हेही वाचा – IPL 2024 : जसप्रीत बुमराहसमोर विराट कोहली पुन्हा फेल; पाचव्यांदा आऊट! पाहा Wicket
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा