

पुढची आयपीएल (IPL 2024) सुरू होण्यासाठी 4-5 महिने शिल्लक आहेत. याआधी सर्व संघ तयारीला लागले आहेत. पुढच्या हंगामात कोणते खेळाडू संघात आणायचे आणि कोणाला सोडायचे याबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येतात. एका रिपोर्टनुसार आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करनला पंजाब किंग्ज बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. क्रिकबझच्या अहवालानुसार, रिलीजच्या यादीत आणखी अनेक खेळाडूंची नावे समाविष्ट आहेत.
पंजाबने आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात सॅम करनचा समावेश केला होता. सॅमला पंजाब किंग्जने 18.5 कोटींना विकत घेतले. पण त्याला मिळालेल्या भरघोस किंमतीनुसार कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2023 मध्ये सॅम करनने 14 सामन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आणि फक्त 10 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 276 धावा केल्या. शिखर धवन दुखापतग्रस्त असताना त्याने अनेक सामन्यांमध्ये पंजाबचे नेतृत्वही केले होते. पण तो कुठेच आपली पाडू शकला नाही.
हेही वाचा – उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजूरांना वाचवण्यासाठी आलेला फॉरेनर कोण?
कोण कोणत्या खेळाडूला सोडणार पाहा….
चेन्नई सुपर किंग्ज – बेन स्टोक्स
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, मनीष पांडे
गुजरात टायटन्स – यश दयाल, दाशून शनाका, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवान, उर्विल पटेल
कोलकाता नाईट रायडर्स – एन जगदीसन, लॉकी फर्ग्युसन, मनदीप सिंग
लखनऊ सुपर जायंट्स – मार्कस स्टॉइनिस, एविन लुईस, काइल जेमिसन
मुंबई इंडियन्स – जयदेव उनाडकट, इशान किशन, रायली मेरेडिथ, पीयुष चावला, संदीप वॉरियर
पंजाब किंग्ज – हरप्रीत भाटिया, ऋषी धवन, भानुका राजपक्षे, मॅथ्यू शॉर्ट, सॅम करन
राजस्थान रॉयल्स – जेसन होल्डर, केसी करिअप्पा, मुरुगन अश्विन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हर्षल पटेल, दिनेश कार्तिक, अनुज रावत
सनरायझर्स हैदराबाद – हॅरी ब्रूक
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!